पितृपक्षात श्राद्ध का कराल?

भाद्रपदात मासातील कृष्णपक्ष म्हणजेच वद्य पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या काळ म्हणजेच “पितृपक्ष ”.
पितृपक्षास महालय असेही म्हणतात.
पितृपक्षात पूर्वजांना म्हणजेच पितरांना जेवणाचे पान ठेऊन आशीर्वाद घेतला जातो.
तसेच पितृपक्ष संकल्प करणे , श्राद्ध संकल्प करणे , पिंडदान करणे तसेच भरणी श्राद्ध केले जाते .
पूर्वज सवाष्णी असेल तर आयु नवमी ला देखील श्राद्ध केले जाते.
पितृपक्षात पितर गेलेल्या तिथीला संकल्प व तर्पण करून त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवावे. पितर म्हणुन त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीस जेऊ घालतात.